मुंबईमाजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जे जे रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला Anil Deshmukh Discharged From J J Hospital आहे. देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयामध्ये Deshmukh was Admitted to J J Hospital on Friday शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची पुन्हा आर्थर रोड कारागृहामध्ये रवानगी Anil Deshmukh Send Back to Arthur Road Jail After Being Discharged करण्यात आली आहे.
वैद्यकीय तपासण्या करून सोडलेदेशमुख यांना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास जे. जे. रुग्णालयात आणले. त्यांच्यावर उपचार व अन्य वैद्यकीय तपासण्या करून सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांना मागील वर्षी अटक केली आहे. ईडीने अटक केल्यावर त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. मात्र, अटकेत असल्यापासून त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान देशमुख यांच्या वकिलांकडून आरोग्याच्या संदर्भात सुरू असलेल्या समस्यांमुळे त्यांना जामीन देण्यात यावे, असा युक्तिवाददेखील करण्यात आला आहे. मात्र, अद्याप जामीन अर्जावर निकाल येणे बाकी आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.