मुंबई -महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने Chest pain suddenly त्यांना जेजे रुग्णालयात JJ Hospital Mumbai आर्थर रोड तुरुंगातील Arthur Road Jail डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याने दाखल करण्यात आले. त्यांना अचानक चक्कर आल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत असल्याची माहिती मिळत आहे. मे महिन्यात देखील अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परळ येथील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करून पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले होते. त्यावेळी देखील छातीत दुखणे, उच्च रक्तदाब यामुळे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु होते.
Anil Deshmukh अनिल देशमुख यांना जेलमध्ये आली चक्कर, छातीत दुखत असल्यामुळे जेजे रुग्णालयात दाखल - अनिल देशमुख यांना जेलमध्ये आली चक्कर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने Chest pain suddenly त्यांना जेजे रुग्णालयात JJ Hospital Mumbai आर्थर रोड तुरुंगातील Arthur Road Jail डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याने दाखल करण्यात आले. त्यांना अचानक चक्कर आल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत असल्याची माहिती मिळत आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्याविरुद्ध लावलेल्या खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून 100 कोटी रुपये गोळा करण्यास सांगण्यासह अनेक गैरकृत्यांमध्ये देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा -Sonali Phogat Case सोनाली फोगाटचा तो शेवटचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर