मुंबई -काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भारतीय जनता पक्षात आज (बुधवारी) प्रवेश केला. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा, खासदार रिटा बहुगुना आणि आमदार आशिष शेलार उपस्थित होते. काही महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. कृपाशंकर सिंह यांच्यामागे मुंबईमधील खूप मोठा उत्तर भारतीय वर्ग आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आधी शिवसेनेला धक्का देण्यासाठी कृपाशंकर सिंह यांचा मोठा उपयोग भारतीय जनता पक्षाला होणार आहे.
'तीन पक्ष एकत्र असल्याने भारतीय जनता पक्षाला विस्ताराची संधी'
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याने भारतीय जनता पक्षाला आता राज्यामध्ये विस्ताराची मोठी संधी असल्याचे मत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्यात सत्तेत भारतीय जनता पक्ष नसला तरी, राज्यभरातून भारतीय जनता पक्षात लोकं येत आहेत. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि नाशिक जिल्ह्यातील युवा नेता यतीन रावसाहेब कदम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यतीन कदम हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र असून नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. अजूनही राज्यभरातून लोकं भाजपाशी जोडले जाणार असल्याचा, इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
'मनपा निवडणुकीत उत्तर भारतीय जनता भाजपासोबत'