मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीने अनिल देशमुख प्रकरणात चौकशी करीत समन्स बजावला होता. त्यानंतर आज मंगळवार (दि. 7) रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ( Chief Secretary to CM Inquiry by the ED ) अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून काही महत्वाची माहिती मिळवण्याची शक्यता ईडी पडताळून पाहात आहे. EDकडून कुंटे यांना कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. ( Anil Deshmukh ED custody) त्यानुसार कुंटे ईडी चौकशीला हजर राहिले आहेत. या पूर्वी कुंटे यांना तीन समन्स बजावून बोलवण्यात आले होते. मात्र, त्यावेळी प्रशासकीय कामे आणि मंत्रिमंडळाची बैठक व दौरे यामुळे कुंटे यांनी ईडीकडे वेळ मागून घेतला होता. अखेर ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल फोन टॅपिंग प्रकरणातही चौकशी
परमबीरसिंग यांनी देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपानंतर गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण बाहेर आले. शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा धक्कादायक अहवाल दिला होता. ( ED inquires into Anil Deshmukh case ) यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आणि त्यांच्या पोस्टींगसाठी मध्यस्थांमार्फत लाचेचा मुद्दा समोर आला. त्यामुळे राज्यभर वादळ उठले.
शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली
फोन टॅपिंग प्रकरणात कुंटे यांनी राज्य सरकारला अहवालही सादर केला आहे. यामध्ये त्यांनी शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार संबंधित काळात कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसल्याचे म्हटले आहे. शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली त्यावेळी कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. त्यांनी परवानगी दिल्याचा दावा शुक्ला यांनी केला होता. पण परवानगी घेताना शुल्का त्यावेळी खोटे बोलल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची ईडीकडूनही चौकशी सुरू आहे. त्यामुळे ईडीने कुंटे यांना चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजते.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हेही वाचा -Contempt Petition On Nawab Malik : नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखडे यांची अवमान याचिका