मुंबई -काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते मराठवाड्याचा आणि राज्याचा चेहरा तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Former Chief Minister Ashok Chavan हे आता काँग्रेसला Congress सोडचिट्टी देण्याच्या विचारात असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये जाण्याची Ashok Chavan possibility to join BJP दाट शक्यता असून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश Join BJP केल्यास त्यांच्यासाठी सामाजिक न्याय आणि ऊर्जा ही महत्त्वाची खाती राखून ठेवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक चव्हाण का आहेत नाराज ? :माजी मंत्री अशोक चव्हाण हे गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहेत. नाना पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांना पक्षात डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. विश्वास दर्शक ठरावा दरम्यान अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे काही आमदार अनुपस्थित राहिले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जाहीर आभारही व्यक्त केले होते. यानंतर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. उशीर झाल्यामुळे आपण सभागृहात येऊ शकलो नाही, हे सांगूनही कारणे दाखवा नोटीस बजावली गेल्यामुळे ते नाराज झाले आहेत.