मुंबईशिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून सध्या मुंबईत तणावाच वातावरण आहे. मुंबई महानगरपालिकेची मेळाव्यासाठी परवानगी नेमका कोणाला मिळणार, यावरून शिंदे गट व ठाकरे गटात मोठे ओढाताण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिष्ट मंडळ आज मुंबईतील महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) जी उत्तर विभागात भेट देण्यास गेले होते. ( Milind Vaidya On Dasara gathering ) शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य, महेश सावंत आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Milind Vaidya On Dasara gathering परवानगी मिळो अथवा नको, आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच- मिलिंद वैद्य - Mumbai Municipal Corporation
Milind Vaidya On Dasara gathering शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून सध्या मुंबईत तणावाच वातावरण आहे. मुंबई महानगरपालिकेची मेळाव्यासाठी परवानगी नेमका कोणाला मिळणार, यावरून शिंदे गट व ठाकरे गटात मोठे ओढाताण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिष्ट मंडळ आज मुंबईतील महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) जी उत्तर विभागात भेट देण्यास गेले होते.
एक महिन्यापूर्वी पत्र दिलेया भेटीसंदर्भात माहिती देताना माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य म्हणाले की, आम्ही दसरा मेळाव्याबद्दल ही भेट घेतली असून शिवतीर्थावर परवानगी मिळण्याच्या अनुषंगाने ही भेट होती. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान देण्यात यावे, यासाठी सर्वात आधी पालिकेकडे अर्ज केला होता. मात्र साधारण आता महिना झाला तरी, अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. किंवा त्या संदर्भातील परवानगी दिल्याचं अथवा परवानगी नाकारल्याचं कोणतंही पत्र आम्हाला अद्याप देण्यात आलेले नाही.
तर हे सरकार आणि प्रशासन जबाबदारपुढे बोलताना वैद्य म्हणाले की, महानगरपालिकेने विधी विभागाकडे त्यांचा शिवतीर्थसंबधातला अर्ज दिला आहे, आणि विधी विभाग या अर्जाची लेखी प्रतिक्रिया देणार आहे. जर महानगरपालिकेने दसऱ्या मेळाव्याची परवानगी दिली नाही, तरीसुद्धा आम्ही दसरा मेळावा शिवतीर्थावरच करणार आहोत. या संदर्भात आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू त्यानंतर पुढील निर्णय जाहीर होईल, पण आम्ही हे आत्ताच स्पष्ट करतो. पालिका आम्हाला परवानगी देव अथवा ना देव आमचा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्याला सर्वस्वी हे सरकार आणि हे प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा मिलिंद वैद्ययांनी दिली आहे.