मुंबई -अन्वय नाईक कुटुंबियांनी एक पत्रकार परिषद घेत माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्यावर आज किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेत अन्वय नाईक कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तुम्ही उद्धव ठाकरे यांना मदत करत आहात का? कारण तुमचे जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे, त्यात रश्मी ठाकरे यांचं नाव सातबाराच्या उताऱ्यावरती आहे आणि त्याचे पुरावे देखील मी वेळोवेळी दिलेले आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबीय अन्वय नाईक कुटुंबियांच्या आड राहून मनी लाँड्रिंग करत आहे का? असा सवाल या वेळेस पत्रकार परिषदेत किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या हेही वाचा -आता टी-२० मालिकाविजयाचे लक्ष्य! भारत-इंग्लंडमध्ये आज पहिली टी-२० लढत
कोरोना वाढायला ठाकरे सरकार जबाबदार
या ठाकरे सरकारच्या काळामध्ये कोविड आणि भ्रष्टाचार या दोनच गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत असंच काहीसं दिसून येत आहे. मी गेल्या काही दिवसांमध्ये जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये भेट दिली. या सगळ्या जम्बो कोविड केअर सेंटरचे काम ठाकरे सरकारने आपल्या नातेवाईकांनाच दिलेले आहे असं आढळून आले आहे. त्या संदर्भात मी काही पत्र व्यवहार केले, त्यात मला अशी माहिती आढळून आली की श्वास कन्स्ट्रक्शन कंपनीला या सगळ्या कामांमध्ये खूप मोठा फायदा मिळालेला आहे आणि त्या संदर्भात मी पुरावे आज आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारवरती माझं गंभीर आरोप आहे की, या सगळ्या कोविडच्या काळांमध्ये ठाकरे सरकारने लोकांचा विश्वासघात केला आहे. कोविडच्या वाढीसाठी फक्त आणि फक्त ठाकरे सरकार हे कारणीभूत आहे, अशी टीका पत्रकार परिषदेत किरीट सोमैय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हेही वाचा -आता मराठीतून ऐकायला येणार आयपीएलची कॉमेंट्री!
ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. त्या संदर्भात मी गेल्या आठवड्यांमध्ये दिल्लीला असताना केंद्रीय आरोग्य सचिवांशी चर्चा केली आणि राज्यात अतिरिक्त कोविड लसींचा साठा आणि अत्याधुनिक उपकरणं देण्यात यावी, अशी मी विनंती त्यांना केली आहे. त्यानुसार त्यांनी ती मागणीसुद्धा मान्य करत आम्ही पूर्णपणे महाराष्ट्राला सहकार्य करू असे त्यांनी सांगितले आहे. परंतु महाराष्ट्रात वेगळेच चित्र आहे. महाराष्ट्रात कोविडच्या नावाखाली हे सरकार भ्रष्टाचार करत आहे आणि आपल्याच मंत्र्यांना आणि सत्ताधारी लोकांना हे सरकार पाठीशी घालत आहे. तसेच भ्रष्टाचार केला तर गाठ भाजपशी आहे, असा इशाराही सोमैय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.