नवी मुंबई -बेलापूर महानगरपालिका मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मगरीला पकडण्यात यश आले आहे. त्यामळे स्थानिक नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ऑगस्ट महिन्यात नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या खाडीत एक मगर आढळून आली होती. या मगरीला पकडून दुसरीकडे स्थलांतरीत करावे म्हणून बेलापूर गावातील स्थानिक नागरीकांनी वन विभागाकडे मागणी केली होती. मात्र वन विभागाने स्थळ पाहणी करून देखील मगर पकडण्यासाठी कोणतीही कारवाई केली नव्हती.
नवी मुंबईतील मगरीला पकडण्यात वनविभागाला यश १५ ते १७ फेब्रुवारीला पुन्हा आढळून आली मगर- ही मगर पुन्हा १५ फेब्रुवारी व १७ फेब्रुवारी रोजी एकदा बेलापूर खाडीत आढळून आली आहे. त्यामुळे या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांत व स्थानिक नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या मगरीला वनविभाने तात्काळ पकडून इतरत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने वन विभागाने बेलापूर खाडीची स्थळ पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणचा परिसर जाळीने बंदिस्त करून पिंजरा लावण्यात आला व त्यावर लक्ष ठेवले. अखेर ही मगर २३ फेब्रुवारीला त्या पिंजऱ्यात अडकली. त्यामुळे ही मगर पकडल्याने स्थानिक नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
मगर असल्याची खात्री करत वनविभागाने लावला पिंजरा-
बेलापूर खाडीत मगर असल्याची खात्री केल्यानंतर या मगरीला पकडण्यासाठी १८ फेब्रुवारीला खाडीच्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पिंजरा लावण्यात आला होता. अखेर २३ तारखेला पिंजऱ्यात ही मगर सापडली या मगरीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पाच दिवस ठेवण्यात येईल व पुढील स्थिती पाहून तिला कूठे सोडायची याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती क्षेत्रीय वन अधिकारी नरेंद्र मुठे यांनी दिली आहे.
हेही वाचा- कोल्हापूर : राज्य सरकारच्या मोघलाई विरोधात समरजित घाटगेंचं आंदोलन - देवेंद्र फडणवीस