महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परकीय चलन साठा 4.5 अब्ज डॉलरने वाढून 579.34 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर - परकीय चलन साठा

देशाच्या परकीय चलन साठा 4 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 4.52 अब्ज डॉलरने वाढून 579.34 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.

Foreign exchange
परकीय चलन

By

Published : Dec 16, 2020, 6:40 PM IST

मुंबई - देशाच्या परकीय चलन साठा 4 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 4.52 अब्ज डॉलरने वाढून 579.34 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

वृशांक जैन - मार्केट एक्स्पर्ट

नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी

मागील नोव्हेंबर महिन्याच्या संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय चलन साठा 469 दशलक्ष डॉलर्सने घसरून 574.821 अब्ज डॉलरवर आला आहे. अहवाल देण्याच्या कालावधीत परकीय चलन मालमत्तेत (एफसीए) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे चलन साठ्यात वाढ झाली. परकीय चलन मालमत्ता हा एकूण परकीय चलन साठ्यातील महत्त्वपूर्ण भाग आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार एफसीए 3.932 अब्ज डॉलरने वाढून 537.386 अब्ज डॉलरवर गेला आहे.

एफसीए डॉलरमध्ये नामांकित आहे, परंतु, त्यात इतर युरो, पाउंड आणि येन सारख्या विदेशी चलनांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, 4 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात पुनरावलोकनानुसार देशाच्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य 53.5 दशलक्ष डॉलर्सने वाढून 35.728 अब्ज डॉलर झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मधील देशातील विशेष रेखांकन अधिकार 1.2 करोड डॉलर्सने वाढून 1.506 अब्ज डॉलर झाले आणि आयएमएफचे साठा 4.6 करोड डॉलर्सने वाढून 4.725 अब्ज डॉलरवर गेला.

ABOUT THE AUTHOR

...view details