मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध दौरे आणि सभा, कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. रात्री उशिरापर्यंत जागून ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना खूपच शारीरिक थकवा आला असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात पुणे- नाशिक आणि औरंगाबाद येथे विभागीय बैठका घेतल्या आहेत. तसेच काही मतदारसंघांमध्ये सभा आणि मेळावे सुद्धा घेतले. तसेच विविध विकास कामांचे उद्घाटनही त्यांनी सपाट्याने केले आहे. मुंबईतही अनेक बैठका आणि कार्यक्रमांना त्यांनी सातत्याने उपस्थिती लावली. या दरम्यान रात्री उशिरापर्यंत काम केल्याने त्यांना आता शारीरिक थकवा आला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवसाची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
सर्व प्रशासकीय बैठका रद्द -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. मंत्रालयात विविध विकास कामांचा आढावा आणि अन्य बैठका घेण्यात येणार होते. मात्र, त्यांनी या बैठका रद्द करीत असल्याचे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी लावली गणेशोत्सव मंडळाच्या बैठक हजेरी -गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी ( CM Eknath Shinde attended meeting of Ganeshotsav Mandal ) दिले.