मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकरणीत पहिल्यांदाच दोन तृतीयपंथीयांना स्थान देण्यात आले आहे. सलमा खान साकेरेकर आणि पार्वती जोगी यांची काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. या वर्गासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना संधी देत सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसच्या कार्यकारणीत पहिल्यांदाच दोन तृतियपंथियांना स्थान
प्रदेश काँग्रेस कार्यकरणीत पहिल्यांदाच दोन तृतीयपंथीयांना स्थान देण्यात आले आहे. सलमा खान साकेरेकर आणि पार्वती जोगी यांची काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. या वर्गासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना संधी देत सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची वर्णी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांसह 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्ये ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तर, उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. अमरजित मनहास यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी दिली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, शिवराज पाटील यांचे चिरंजीव शैलेश पाटील, आशिष देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याकडे जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी सोपवली आहे. तर, सचिन गुंजाळ हे सचिवपदी असणार आहेत. काँग्रेस नेते माणिक जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला संधी देण्यात आली आहे.