मुंबई- लॉकडाऊनमुळे भुकेलेल्या गोरगरीब, हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी काळाचौकी येथील स्वराज्य प्रतिष्ठाणने 'भूक म्हणजे काय आम्ही जाणतो', असा अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुढील १० दिवस मोफत अन्नदान करणार आहे. पहिल्याच दिवशी सुमारे १५० लोकांना मोफत जेवण पुरवण्यात आले. असे प्रतिष्ठाणचे संस्थापक उदय पवार यांनी सांगितले.
भुकेलेल्यांसाठी अन्नदान स्वराज्य प्रतिष्ठाणचा उपक्रम - अन्नदानस्वराज्य प्रतिष्ठाणचा उपक्रम
लॉकडाऊनमुळे भुकेलेल्या गोरगरीब, हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी काळाचौकी येथील स्वराज्य प्रतिष्ठाणने 'भूक म्हणजे काय आम्ही जाणतो', असा अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुढील १० दिवस मोफत अन्नदान करणार आहे. पहिल्याच दिवशी सुमारे १५० लोकांना मोफत जेवण पुरवण्यात आले. असे प्रतिष्ठाणचे संस्थापक उदय पवार यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आले. अचानक लॉकडाऊन केल्याने सर्वच ठप्प झाले. खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स देखील बंद झाल्याने अनेकांचे हाल झाले. हातावर पोट असलेल्या गरीब, दुर्बल घटक, भिकारी आणि सर्व सामान्य नागरिकांची जेवणाअभावी मोठी फरफट झाली. दरम्यान, अनेक संस्था पुढे आल्याने भुकेने व्याकूळ असलेल्यांची थोडी फार भूक क्षमविण्यास यामुळे मदत झाली. मात्र काहींपर्यंत जेवण मिळालं तर काही उपेक्षित राहले. स्वराज्य प्रतिष्ठाणने यावेळी काही छोटी मदत करण्याचा प्रयत्न केला. भूक काय असते आम्ही जाणतो लॉकडाऊन त्यानंतर शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसऱ्या लॉकडाऊनची तयारी झाली. अखेर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत त्यावर निर्बंध आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले. लॉकडाउनमुळे फेरीवाले, टॅक्सीवाले, रस्त्यांवर राहणारे गोरगरीब लोकांच्या बऱ्याच अडचणी वाढल्या. अनेक जणांकडून जेवणाची, औषधोपचाराची व्यवस्था करावी, यासाठी आम्हाला फोन येऊ लागले. सुरुवातीला वैयक्तिकरित्या थोडी फार मदत केली. मात्र लोकांकडून सतत मदतीसाठी विचारणा होऊ लागल्याने स्वराज्य संस्थेच्यावतीने मोफत अन्नदान करण्याचा निर्णय घेतला.
'भूक काय असते आम्ही जाणतो', असा उपक्रम यावेळी हाती घेऊन गोरगरिबांना मोफत जेवण पुरवत आहोत. पुढील १० दिवस अन्नदान काळाचौकी ही कलाकारांची, राजकारणाची, सामाजिक कार्यकत्यांची भूमी ओळखली जाते. या काळाचौकीचा मान ठेवून उपाशी पोटी कोणी राहू नये, भुकेमुळे कोणावर आजरपण ओढवू नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच दहा दिवस २०० लोकांना एकवेळ जेवण आणि पाण्याची मोफत व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे, असे उदय पवार यांनी सांगितले. स्वराज्य प्रतिष्ठाणच्या अभूतपूर्व अन्नदान उपक्रमाचे काळाचौकी भागात तोंडभरून कौतुक होत आहे. लॉकडाऊनमुळे जेवण मिळण्यास अडचणी आल्या. परंतु, स्वराज्य प्रतिष्ठाणने गरिबांची भूक भागवली. हा युवक गरीब घरातील असून अन्नदानाचे काम करत आहे. त्यांच्या सेवाभावी कामाला प्रोत्साहन मिळू दे, असे दिव्यांग नागरिक आबा पासी यांनी सांगितले. मी टॅक्सी चालक आहे. दिवसभर टॅक्सी चालविल्यामुळे भुकेने व्याकुळ झालो होतो. अनेक ठिकाणी जेवण मिळतंय का पाहिलं. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठाणची माहिती मिळाली अन् इथे आलो. जेवणही चांगलं आहे, असे टॅक्सी चालक शिव प्रसाद मिश्र यांनी सांगितले.