मुंबई -राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात कोरोना संक्रमण पसरू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यावर एक समिती गठीत करून त्या समितीद्वारे राज्यातील कैद्यांना तात्पुरता पॅरोलवर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यानंतरही राज्यात क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवण्यात आल्याचे समोर आलेला आहे. राज्यातील 46 कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमताही ते 20 हजार 217 असताना सध्याच्या घडीला क्षमतेपेक्षा अधिक 32 हजार 576 कैद्यांना कारागृहात ठेवण्यात आले आहे. या वरचा ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी राज्यातील कारागृहातील कैद्यांची संख्या -
पश्चिम कारागृह क्षेत्र राज्यातील एकूण 46 कारागृहात पैकी, पश्चिम कारागृह क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर येरवडा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ही 2449 कैद्यांची असताना याठिकाणी दुप्पट 5906 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. सातारा जिल्हा कारागृहाची क्षमता 168 कैद्यांची असताना या ठिकाणी 266 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात 1699 कैदी क्षमता असताना या ठिकाणी 2059 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. सोलापूर जिल्हा कारागृहाची क्षमता 141 कैद्यांची असताना या ठिकाणी 316 कैदी ठेवण्यात आलेले आले असून, अहमदनगर जिल्हा कारागृहाची क्षमता 69 कैद्यांची असताना या ठिकाणी 133 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. मध्य कारागृह क्षेत्र औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 539 कैद्यांची असताना या ठिकाणी 1166 कैदी सध्याच्या स्थितीला ठेवण्यात आले आहेत. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह क्षमता 3018 कैद्यांची असताना या ठिकाणी 2312 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. परभणी जिल्हा कारागृहाची क्षमता 252 कैद्यांची असताना या ठिकाणी 325 कैदी ठेवण्यात आले असून, नांदेड जिल्हा कारागृहाची क्षमता 135 कैद्यांची असताना 461कैदी या कारागृहात ठेवण्यात आलेले आहेत. जळगाव जिल्हा कारागृहाची क्षमता 200 कैद्यांची असताना या ठिकाणी 373 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तर धुळे जिल्हा कारागृहाची क्षमता 294 कैद्यांची असताना या ठिकाणी 312 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. दक्षिण कारागृह क्षेत्र दक्षिण कारागृह क्षेत्रात मुंबई मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 804 कैद्यांची असताना 2803 कैद्यांना ठेवण्यात आलेले आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1105 असताना या ठिकाणी तब्बल 3 हजार 501 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तळोजा मध्यवर्ती कारागृहाची शमता 2124 कैद्यांची असताना सध्याच्या घडीला या ठिकाणी 2766 कैदी असून, कल्याण जिल्हा कारागृहाची क्षमता केवळ 540 कैद्यांची असताना या ठिकाणी 1759 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. मुंबई महिला कारागृहाची क्षमता 265 महिला कैद्यांची असताना या ठिकाणी 313 महिला कैद्यांना ठेवण्यात आले असून, अलिबाग जिल्हा कारागृह क्षमता 82 कैद्यांची असताना या ठिकाणी 138 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. पूर्व कारागृह क्षेत्र नागपूर मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1810 कैद्यांची असताना या ठिकाणी 2471 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. अमरावती मध्यवर्ती कारागृह ची क्षमता 943 असताना या ठिकाणी 1007 कैदी ठेवण्यात आले असून, बुलडाणा जिल्हा कारागृहाची क्षमता 181 असताना या ठिकाणी 203 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. वर्धा जिल्हा कारागृहाची क्षमता 252 कैद्यांची असताना या ठिकाणी 302 कैदी ठेवण्यात आलेले असून चंद्रपूर जिल्हा कारागृहाची क्षमता 333 कैद्यांची असताना 420 कैदी या कारागृहात ठेवण्यात आलेले आहेत.
पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्यांची संख्या -
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातील 1127 कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडण्यात आलेले असून आपत्कालीन पॅरोलवर 121 कैद्यांना सोडण्यात आलेले आहे. सध्याच्या घडीला 36,832 कैद्यांपैकी 1248 कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडण्यात आलेले आहे.