मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह शोविक चक्रवर्तीवर विविध आरोप ठेवण्यात आले. सीबीआय तपासादरम्यान या प्रकरणात ड्रग्जच कनेक्शन समोर आले. यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची चौकशी केली.
रियाच्या गाडीचा पाठलाग कराल..तर वाहन जप्त होईल! मुंबई पोलिसांचे आदेश - पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशनदार
माध्यम प्रतिनिधींनी सरकारी गाड्या तसेच चौकशीच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या चारचाकींचा पाठलाग करत कव्हरेज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापुढे अशा प्रकारे गाड्यांचा पाठलाग करणे महागात पडणार आहे.
या प्रकरणाला माध्यमांनी विविध प्रकारे कव्हरेज दिले. मात्र काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी पत्रकारितेचे प्रोटोकॉल बाजूला सारत रिया, शोविक यांच्या गाड्यांचा पाठलाग केला. अनेकदा माध्यम प्रतिनिधींनी सरकारी गाड्या तसेच चौकशीच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या चारचाकींचा पाठलाग करत कव्हरेज देण्याचा प्रयत्न केला.
मात्र यापुढे अशा प्रकारे गाड्यांचा पाठलाग करणे महागात पडणार आहे. एनसीबी कार्यालयात पोहोचताना किंवा परत येताना मीडियाकर्मींनी आरोपींच्या वाहनांचा पाठलाग केल्यास थेट वाहन जप्त होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशनदार यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींविरोधात कडक पावलं उचलण्यात येतील, असे ते म्हणाले.