महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईवर दाट धुक्याची चादर; तापमान घसरल्यानं मुंबईकर गारठले

आज सकाळी मुंबईवर धुक्‍याची चादर दिसून आली. गेल्या तीन ते चार दिवसापासून मुंबईच्या वातावरणात बदल झाला होता. त्याचाच परिणाम म्हणून आज सकाळी मुंबईवर दाट धुक्याची चादर दिसून आली.

Fog in Mumbai
मुंबईवर दाट धुक्याची चादर; तापमान घसरल्यानं मुंबईकर गारठले

By

Published : Dec 5, 2021, 3:43 PM IST

मुंबई -मुंबई वातावरण बदलाचा परिणाम आज सकाळपासूनच जाणवू लागला आहे. आज सकाळी मुंबईवर धुक्‍याची चादर दिसून आली. गेल्या तीन ते चार दिवसापासून मुंबईच्या वातावरणात बदल झाला होता. त्याचाच परिणाम म्हणून आज सकाळी मुंबईवर दाट धुक्याची चादर दिसून आली. यामुळे वाहन धारकांना सुद्धा नियंत्रणात वाहन चालवावे लागले. तर सकाळीच खेळाच्या मैदानात जाणारे खेळाडू या घाट धुक्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईच्या वातावरणात बदल

आज मुंबईमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. पश्चिम उपनगर पूर्व उपनगर या ठिकाणी देखील धुक्याची चादर दिसून आली. गेल्या तीन दिवसाच्या अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा हा काही प्रमाणात खाली आला आहे. मुंबईचे वातावरण आल्हाददायक वाटत आहे. मात्र, याचा वाहतुकीवर काही प्रमाणात झाला होता. त्यामुळे मुंबई लोकल आणि रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम दिसून आला होता. व्यायाम आणि जॉगिंग करण्यासाठी आणि या वातावरणात फिरण्यासाठी मुंबईकर मोठया प्रमाणात बाहेर पडले आहेत.

तीन दिवसापासून मुंबईमध्ये पावसाळी वातावरण तयार झालं होतं. मात्र, आता अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा याची स्थिती देखील निवळत आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण दूर होऊन कोरडे हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने दिवसाचा गारवा कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details