महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूरमधील पुरामुळे तपासात अडचण - एसआयटी - मुंबई उच्च न्यायालय

कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात एसआयटीकडूनही तसाच प्रकार होत असल्याचे न्यायालयाने विचारले. या प्रकरणी कोल्हापूरमध्ये असलेल्या पूर परस्थितीमुळे कोल्हापूरशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे पानसरे प्रकरणातील तपासावरही त्याचा परिणाम झाल्याचे कारण देण्यात आले.

पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर मधील पुरामुळे तपासात अडचण - एसआयटी

By

Published : Aug 9, 2019, 4:21 PM IST

मुंबई -दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी वापरण्यात आलेले हत्यार खाडीत फेकून देण्यात आले आहे. खाडीत फेकलेल्या हत्याराचे अवशेष शोधण्यासाठी परदेशातून डायव्हर्स बोलावणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात सीबीआय कडून देण्यात आली आहे.

डॉ दाभोलकर हत्या प्रकरणी तपास यंत्रणांचा सुरू असलेला तपास व आता पर्यंतची प्रगती या बद्दल न्यायालयाने या आगोदारच नाराजी व्यक्त केली होती. कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये संदर्भात एसआयटी कडूनही तसाच प्रकार होत असल्याचे न्यायालयाने विचारले. या प्रकरणी कोल्हापूर मध्ये असलेल्या पूर परस्थितीमुळे कोल्हापूरशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे पानसरे प्रकरणातील तपासावरही त्याचा परिणाम झाल्याचे कारण, या प्रकरणात तपास करत असलेल्या एसआयटीकडून मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details