महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'एसटी'ला देखील महापुराचा फटका, सुमारे १०० कोटींचे नुकसान - maharashtra flood

एकट्या कोल्हापूर एसटी विभागाचा दैनंदिन महसूल 50 लाख आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून या विभागाच्या 12 आगारांतून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. अशीच परिस्थिती सांगली, सातारा व कोकणातील काही विभागांमध्ये आहे.

flood affects ST bus service in maharashtra faces loss of approx 100 crore rupees

By

Published : Aug 10, 2019, 6:58 PM IST

Updated : Aug 10, 2019, 7:17 PM IST

मुंबई- महाराष्ट्रातील पूर परिस्थितीचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला देखील बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागांमध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठिकाणी ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजच्या 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत असून, आत्तापर्यंत गेल्या 10 दिवसात सुमारे 50 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

यासोबतच अनेक आगार, बसस्थानके आणि बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतरच या स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल. मात्र, सद्यस्थितीला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.

एसटीचा दररोज 18 हजार बसेसच्या माध्यमातून 55 लाख किलोमीटर इतका प्रवास होतो. त्यातून सरासरी 22 कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून दररोज एसटीचे किमान 10 लाख किलोमीटरच्या बस फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे एसटीला 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल 50 लाख आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून या विभागाच्या 12 आगारांतून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. अशीच परिस्थिती सांगली, सातारा व कोकणातील काही विभागांमध्ये आहे.

Last Updated : Aug 10, 2019, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details