रत्नागिरी - परिवहन मंत्री तथा पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते शासकीय कार्यलय येथे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने ध्वजारोहण पार पडले. यावेळी प्रसारमाध्यमांना बोलताना ते म्हणाले की, एसटी विलिनिकरणाचा मुद्दा हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर असल्याने या समितीच्या व्यतिरिक्त कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. संपामुळे एसटीचे पर्यायाने सरकारचे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. लोकांना चुकीच्या पद्धतीने वेठीला धरलं जात आहे.
Breaking News Live Updates : देशात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - आजच्या ठळक बातम्या
12:42 January 26
संपामुळे एसटीचे पर्यायाने सरकारचे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान
12:41 January 26
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण संपन्न!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई मधील प्रदेश कार्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन पार पडला. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज झालेल्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे रोहित पाटील यांना देण्यात आला.
12:40 January 26
नागपुरातील शाळा, महाविद्यालये लवकर सुरू
नागपूर - पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी दोन वर्षात राज्य सरकारने कोरोनाच्या संकटात केलेल्या कामाचा पाढा वाचला. नागपुरातील शाळा, महाविद्यालये लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. वीज बिलांची थकबाकी वाढत असल्याने उर्जा मंत्रालयाच्या अडचणी वाढल्या आहे. वीज बिल भरण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी योजना क्रियांवित करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांना या योजनेचा फायदा झाला आहे. नागरिकांनी वीज बिल भरून योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
12:40 January 26
शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी
अमरावती - प्रजासत्ताक दिन देशाच्या कानाकोपऱ्यात उत्साहात साजरा होत आहे. या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.तिकडे पश्चिम वऱ्हाडाच वैभव असलेली अमरावती जिल्ह्यातील ब्रिटिश कालीन शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावे, यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्यवर भजन, कीर्तन, कविता व ध्वजारोहण करून रेल्वे सुरू करण्याची पुन्हा मागणी करण्यात आली आहे.
10:54 January 26
औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या ध्वजारोहण सोहळा संपन्न
औरंगाबाद - प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी राज्य सरकार उल्लेखनीय काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल घेतली जात असून केलेल्या कामामुळे सर्वसामान्यांच्या मनात घर केल असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऑरिक सिटीमध्ये फार्म कंपनीने 700 कोटींची गुंतवणूक केली असून, त्यांच्यासाठी 30 एकर जागा देण्यात आली आहे. तर आतापर्यंत ऑरिक सिटीमध्ये 125 कंपन्यांना भूखंड वाटप झाला असून पाच हजार कोटींची गुंतवणूक आणि सहा हजार लोकांचा रोजगार निर्मिती झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
10:21 January 26
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे शासकीय इमारतीत ध्वजारोहण संपन्न
वांद्रे येथील शासकीय इमारती ध्वजारोहणाचा कार्यक्रम पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी होते. आता त्यांची तब्येत ठीक आहे. कोरोनामुळे थोडी काळजी घेण्यात येत होती. नामकरणाचा निर्णय महापालिका घेते. लाड क्रीडा संकुलच्या नामकरणाच्या वादात मला पडायचं नाही. महापौरांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
10:05 January 26
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई - 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण समारंभ आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.
10:05 January 26
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण
दिल्ली - प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला आहे. यावेळी त्यांनी दिनानिमित्त मी सर्व भारतीयांना माझ्या शुभेच्छा दिल्या. देशासाठी प्राणांची आहुती देणार्या सर्व शूर सैनिकांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो, असेही ते म्हणाले.
09:51 January 26
सकाळी दहा वाजल्यापासून राजपथावर संचलन होणार
सकाळी दहा वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजपथावर दाखल होणार आहेत. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
09:05 January 26
Breaking News Live Updates : देशात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मुंबई - भारतात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला होता. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो.
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.
हेही वाचा -RSS Flag Hoisting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुर मुख्यालयात ध्वजारोहण