मुंबई - युरोप आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढले आहेत. दक्षिण आफ्रिकेत (New corona Variant in South Africa) कोरोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरियंट (Omicron New Corona Variant) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC Precautions) देशाबाहेरून आलेल्या २८६८ प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. त्यापैकी ४ प्रवासी आणि १ जण त्यांच्या सहवासातील असे एकूण ५ जण कोरोना पॉझिटिव्ह (International passengers Corona Positive) आले आहेत. या सर्वांची जीनोम सिक्वेन्सिंग तसेच एस. जीन चाचणी केली जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (BMC Additional Commissioner Suresh Kakani) यांनी दिली.
- विमानतळावर तपासणी -
मुंबईसह राज्यात गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला यश आले आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असतानाच, परदेशातील काही देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तर दक्षिण आफ्रिकेसह काही देशात ओमायक्रॉन कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर आला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी सुरू केली आहे.
- ५ जण कोरोना पॉझिटिव्ह -