मुंबई : पाचवी आणि आठवी अशा दोन्ही वर्गांमधील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेला ( Maharashtra Scholarship Exam ) यंदा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ( Maharashtra State Council Of Examination ) प्रतिवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. 2021-22 साठी होणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तब्बल ५ लाख ४६ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
गतवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षेला फारच कमी नोंदणी झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने 2021-22 साठी ५ लाख ४६ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. यामध्ये इयत्ता पाचवीच्या राज्यातील ३८ हजार ७३४ शाळांमधील ३ लाख १६ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील २ लाख १९ हजार ७ विद्यार्थ्यांना शुल्क भरून आपली नोंदणी निश्चित केली आहे, तर ९७ हजार ३५४ विद्यार्थ्यानी अद्याप शुल्क भरलेले नाही.