महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fit Maharashtra : नियमित व्यायाम करा, तरच निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल - उपमुख्यमंत्री अजित पवार - फिट महाराष्ट्र कार्यक्रम अजित पवार प्रतिक्रिया

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने फिट महाराष्ट्र ( Fit Maharashtra ) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on health in Fit Maharashtra ) यांच्या हस्ते करण्यात आले.

Fit Maharashtra Ajit Pawar
फिट महाराष्ट्र कार्यक्रम अजित पवार प्रतिक्रिया

By

Published : Apr 7, 2022, 10:19 AM IST

मुंबई -जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने फिट महाराष्ट्र ( Fit Maharashtra ) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on health in Fit Maharashtra ) यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांना रोजच्या कामाने येणारा ताण कमी व्हावा यासाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमात कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री आदित्य ठाकरे, अमित देशमुख या कार्यक्रमात सहभागी आहेत.

हेही वाचा -Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स

आरोग्याच्या बाबतीत पूर्वीच्या काळात लक्ष दिले गेले नाही. आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. त्याचे महत्व कोरोनाने जगाला दाखवून दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. नागरिकांनीही सहकार्य केले. मास्क ऐच्छिक असले तरी काळजी घ्या. जागतिक आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या, नियमित व्यायाम करायला हवा. चिंता मुक्त राहायला हवे. तरच निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

यावेळी कोरोनाबाबत बोलताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लॉकडाऊन सुरू होते. मोठे संकट पाहिले, यशस्वी झालो. जागतिक आरोग्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. फिट महाराष्ट्र ही थीमलाईन आहे. कोरोना काळात ठणठणीत आरोग्य असलेल्यांना काही झाले नाही. निरोगी महाराष्ट्र करण्याचा संकल्प करायचा आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

हेही वाचा -INS Vikrant fund case: विक्रांतप्रकरणी सोमैया पिता - पुत्रावर गुन्हा दाखल, माजी सैनिकाने केली तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details