मुंबई : केंद्र सरकारने सुरू केलेल्या "बी एच" या अक्षरांसह असलेल्या भारत सीरिजनुसार देशातील पहिल्या वाहनाची नोंदणी मुंबईत करण्यात आली आहे. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बीएच सीरिजमधील या पहिल्या नोंदणीकृत वाहनाचे अनावरण करण्यात आले. आरसीएफमध्ये कार्यरत महिला अधिकाऱ्यांच्या वाहनाची नोंद या सीरिजमध्ये करण्यात आली आहे.
भारत सीरिजच्या देशातील पहिल्या वाहनाची नोंदणी मुंबईत! - भारत सीरिज
आता "बी एच" या अक्षरांसह असलेल्या भारत सीरिजच्या क्रमांकांनाही सरकारने हिरवा कंदिल दाखविल्याने या सीरिजअंतर्गत वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे. देशातील या सीरिजच्या पहिल्या वाहनाची नोंदणी मुंबईत करण्यात आली आहे.
मुंबईत देशातील पहिल्या बी एच सीरिज वाहनाची नोंदणी
भारत सीरिजनुसार देशातील पहिल्या वाहनाची नोंद मुंबई करण्यात आली आहे. आरसीएफमध्ये काम करणाऱ्या श्रद्धा सुटे यांच्या वाहनाची नव्या सीरिजनुसार नोंदणी करण्यात आली आहे. परिवहन राज्यमंत्र्यांच्या समन्वयातून आठ दिवसांत नोंदणीची सर्व प्रक्रिया केवळ आठ दिवसांत पार पडली याचा आनंद सुटे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता देशात कुठेही गाडी घेऊन फिरणे सोपे झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या पहिल्या वाहनाचे अनावरण केले.
काय होते अडचण?
देशात नवीन वाहन विकत घेतल्यानंतर त्या वाहनाची नोंदणी संबंधित राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात करणे अनिवार्य असते. ही नोंदणी करीत असताना संबंधित राज्याशी संबंधित विशिष्ट अक्षरांनी वाहन क्रमांकाची सुरूवात केली जाते. यामुळे संबंधित वाहन कोणत्या राज्यात नोंद झाले आहे हे स्पष्ट होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी "एम एच" ही अक्षरे वापरली जातात तर उत्तराखंडसाठी "यु के" ही अक्षरे वापरली जातात. प्रत्येक राज्यात वाहनांच्या नोंदीमुळे एका राज्यात नोंद झालेले वाहन दुसऱ्या राज्यात गेल्यास तिथे संबंधित वाहनााच्या मालकाला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. रस्ते करापासून ते अन्य वेगवेगळ्या नियमांना सामोरे जावे लागते. यामुळे प्रवाशांना परराज्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
केंद्राने जाहीर केली भारत सिरीज
यावर मात करण्यासाठी केंद्राने आता भारत सीरिजच्या क्रमांकांचा प्रस्ताव मांडला होता. असे झाल्यास कोणत्याही वाहनाला कोणत्याही राज्यात प्रवास करताना नियमांच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार नाही. नागरिकांचा प्रवास सुखकर होऊ शकतो. आतापर्यंत वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना वाहन क्रमांकात संबंधित राज्याशी संबंधित विशिष्ट अक्षरांचा समावेश असायचा. मात्र, आता "बी एच" या अक्षरांसह असलेल्या भारत सीरिजच्या क्रमांकांनाही सरकारने हिरवा कंदिल दाखविल्याने या सीरिजनुसार वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे.