मुंबई - महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच, ही दुसरी लाट असल्याचे वृत्त सर्वप्रथम 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केले होते. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आली असून, त्यामुळेच रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती फोर्टीस हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे डायरेक्टर आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली होती. लोकसंख्येची घनता, डायबेटीज-हायपरटेन्शनचे रुग्ण, उन्हाचा चटका आणि लोकांचा बेधडकपणा या कारणांमुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढले असून २०२४ पर्यंत कोरोना महाराष्ट्रातून जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.
- लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर मात
लसीकरणाची गती वाढवण्याची नितांत गरज आहे. लसीकरणानंतर लोकांच्या शरीरात कोरोनाला प्रतिरोध करण्याची क्षमता निर्माण होईल. या दरम्यान, कोरोना झालेल्या लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडिज विकसित होतील. यातून हर्ड इम्युनिटी गाठता येईल. हर्ड इम्युनिटीच्या बळावर पोलियो, स्मॉलपॉक्स (देवी) सारख्या रोगांवर मात करता आली. असाच विजय कोरोनावर मिळवता येईल, असे डॉ. राहुल पंडित यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले होते.
- २०२४ पर्यंत कोरोना राहिल सोबत