मुंबई -ओमिक्रॉनची धास्ती असली तरी राज्य सरकारने पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा घेतला आहे. १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने ( Maharashtra education department on schools to reopen ) घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्याबाबत कडक नियमावलीचे पालन करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिली आहे.
सुमारे दीड वर्षानंतर प्राथमिक शाळा सुरू करताना राज्य सरकारने परिपत्रक काढून नियमावली ( Maharashtra gov rules for schools reopening ) जाहीर केली आहे. या ( MH gov notification for schools reopening ) परिपत्रकानुसार शाळा, पालक, विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करावे लागणार आहे.
हेही वाचा-Omicron Variant : ओमिक्रॉनसंदर्भात मंत्रिमंडळ बैठक.. परदेशातील प्रवाशांची माहिती गोळा करा, मुख्यमंत्र्याचे निर्देश
असे आहेत नियम-- सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. त्याचसोबत कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत.
- सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.
- एखादा विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरू करावेत.
कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करून घ्यावी, असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा-vaccination certificates compulsory for Best : बेस्ट प्रवासाकरिता दोन लशींचे प्रमाणपत्र बंधनकारक
विद्यार्थी, शिक्षक, पालक, वाहनचालकांसाठी मार्गदर्शक सूचना
- शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी, दुपारी ठराविक महत्वाच्या विषयांसाठी प्राधान्य द्यावे.
- मार्गदर्शन सूचनांचे (SOP Guidelines for primary schools in MH ) पालन करावे. त्याचबरोबर संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात अथवा गावात करावी.
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का, याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी. तसेच स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झाले असणे बंधनकारक आहे.
- बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यायची आहे.
- सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळा भरणार आहेत. तसेच ३ ते ४ तासच शाळा भरतील.
- मैदानी खेळ किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे.
- घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे.
- जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.
- पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा-Omicron virus threat in Maharahstra : विदेशातून आलेल्या १ हजार पर्यटकांचा शोध सुरू - आदित्य ठाकरे
शाळेचा वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे
- १ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांना शाळा भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा लागणार आहे. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.