महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुबंईचा ग्राऊंड रिपोर्ट: 'ब्रेक द चेन' मोहिमेचा पहिला दिवस

महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन'च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहे. 22 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू झाले आहेत. तसेच 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहे.

मुबंईचा ग्राऊंड रिपोर्ट
मुबंईचा ग्राऊंड रिपोर्ट

By

Published : Apr 23, 2021, 2:11 AM IST

मुंबई -महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन'च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहे. 22 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहे. या नियमावलीनुसार, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असणार आहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असणार आहे.

नियमावली?

1. महाराष्ट्रात गुरुवारी रात्री 8 वाजेपासून कडक निर्बंध लागू
2. ‘1 मे’च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध
3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
5. राज्यात जिल्हाबंदी लागू
6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेने चालणार
10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेने सुरू राहणार
11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड
13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती
14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीने चालणार
15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी
16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार
17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार
18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार

हेही वाचा -मुंबईत चौथ्या दिवशी रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात, 75 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details