महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील पहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कोहिनूर वाहनतळात सुरू, आदित्य ठाकरेंनी केले उद्घाटन - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. वातावरणीय बदलाच्या आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात शासनाचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाले आहे. या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून शासनामार्फत पर्यावरण पूरक विविध धोरणे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वाहन चार्जिंग स्टेशन कोहिनूर वाहनतळात सुरू
वाहन चार्जिंग स्टेशन कोहिनूर वाहनतळात सुरू

By

Published : Aug 18, 2021, 11:04 AM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन मंगळवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्टेशन आणखी वाढविण्याची सूचना ठाकरे यांनी केली आहे. या कार्यक्रमप्रसंगी आमदार सदा सरवणकर, महापालिकेच्या जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर उपस्थित होते.

वातावरणीय बदलाच्या आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात शासनाचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाले आहे. या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून शासनामार्फत पर्यावरण पूरक विविध धोरणे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन

24 तासात 72 वाहने होणार चार्ज-

मुंबईचे पहिले एकात्मिक सार्वजनिक वाहनतळ असलेल्या दादरमधील कोहिनूर वाहनतळात विविध सुविधांसह आशुतोष एन्टरप्राइजेसच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या जी/उत्तर विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या वाहनतळात चार डीसी आणि तीन एसी अशा दोन प्रकारचे सात चार्जर बसविण्यात आले आहेत. याद्वारे २४ तासात सुमारे ७२ वाहने चार्ज होऊ शकतील. यामध्ये दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश असेल. नागरिक ऑटोपार्क मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन पार्किंग बुक आणि आरक्षित करू शकतात, असे ठाकरे म्हणाले.

बेस्टच्या ताफ्यात नव्या 175 इलेक्ट्रिक बस -

बेस्टने पर्यावरण रक्षणासाठी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओलेक्ट्रा या कंपनीकडून काही इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर टाटा कंपनीकडून बसेस भाडेतत्वावर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. टाटाकडून 175 मिनी व आता नव्याने 175 मोठ्या इलेक्ट्रिक गाड्या बेस्टच्या ताफ्यात या स्टेशनच्या उद्घटानापूर्वीच आल्या आहेत. या बस चार्जिंग करण्यासाठी शिवाजी नगर, मालवणी आणि बॅक बे डेपो येथे चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा - बेस्टच्या ताफ्यात पर्यावरण पूरक मोठ्या इलेक्ट्रिक बस, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ABOUT THE AUTHOR

...view details