मुंबई - मुंबईमध्ये नागरिकांसाठी स्मशानभूमी आहेत. मात्र पाळीव पोरांसाठी खासगी स्मशान भूमी आहेत. मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी ( First Cemetery for Pets in Mumbai ) असावी म्हणून दहिसर येथे पाहिली स्मशान भूमी उभारली जात आहे. या स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी असणार आहे. प्राण्यांसाठी ही पहिलीच स्मशानभूमी असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( mumbai mayor kishori pednekar ) यांनी दिली.
प्राण्यांसाठीची पहिली स्मशान भूमी -
मुंबईच्या सर्वात टोकाला दहिसर विभाग आहे. या विभागाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे दहिसर येथे पाळीव प्राण्यांसाठी पहिली स्मशान भूमी उभी राहणार आहे. याचे सादरीकरण आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थित महापौर बंगल्यावर करण्यात आले. यावेळी महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना सर्वच राजकीय पक्ष मतदारनसाठी काम करतात. मात्र आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुक्या प्राण्यांवर काम करण्याचे शिकवले आहे. त्याचंच एक भाग म्हणून अभिषेक आणि त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी पाठपुरावा केल्यावर दहिसर स्मशान भूमीत पाळीव प्राण्यांसाठी पहिली स्मशानभूमी उभी राहत आहे. त्यासाठी २५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून ही स्मशानभूमी पूर्णता इलेकट्रीक असणार असल्याने त्यापासून प्रदूषण होणार नसल्याचे महापौरांनी सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून प्रदूषणमुक्त आणि प्राणायनाची स्मशान भूमी असल्याची कोणतीही जाणीव होणार नाही अशी स्मशानभूमी बनवली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.