महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारावी परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार

धारावी परिसरामध्ये गावदेवी मंदिराजवळील पिवळा बंगला जवळ एका व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा गोळीबार झाला.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Feb 12, 2022, 4:57 PM IST

Updated : Feb 12, 2022, 7:34 PM IST

मुंबई -धारावी परिसरामध्ये गावदेवी मंदिराजवळील पिवळा बंगला जवळ एका व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा गोळीबार झाला.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -Nana Patole criticizes Assam CM : आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले - नाना पटोले

या घटनेत व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

धारावी परिसरामध्ये गावदेवी मंदिराजवळील पिवळा बंगला जवळ मोहम्मद आरिफ उर्फ भैया (वय 35) या व्यक्तीवर 2 अज्ञात लोकांकडून सकाळी 11 च्या सुमारास गोळीबार झाला. त्याच्यावर देशी कट्ट्याने 4 गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात मोहम्मद आरिफ उर्फ भैय्या गंभीर जखमी झाला असून, त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे.

मोहम्मद आरिफ उर्फ भैया हा सकाळी पिवळा बंगला जवळ आला असता त्याच्यावर 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यात मोहम्मद आरिफवर 4 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी 3 गोळ्या मोहम्मद आरिफला लागल्या. त्यामध्ये चेहरा, छाती आणि पाठीला प्रत्येकी एक गोळी लागली असून, यामध्ये आरिफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्याला लागलेल्या गोळ्या ऑपरेशनदरम्यान काढून टाकण्यात आल्याची माहिती धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत पाटील यांनी दिली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आरिफ हा टेम्पो चालक होता आणि त्याच्या नावावर गुन्हा देखील आहे. तर, परवेज बुटा आणि सलिम लंगडा यांनी गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना असून या दोघांचा शोध सुरू आहे. तपासाकरीता गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांची काही पथके बनवली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. तर भर दिवसा गोळीबार होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी झालेल्या फायरिंग तपास सुरू करण्यात आला असून सदर व्यक्तींविरोधात धारावी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. क्राईम ब्रांच या प्रकरणाचा समांतर तपास करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी दिली.

हेही वाचा -Ashish Shelar Criticized Mahavikas Aghadi : 'तानाशाही हरली लोकशाही जिंकली', शेलारांची सरकावर टीका

Last Updated : Feb 12, 2022, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details