महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Crime News खारमधील शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये हवेत गोळीबार, धमकीचे पत्र टाकून हल्लेखोर पसार - Khar Police Station

मुंबईच्या खार (Khar) परिसरामध्ये गजेबो शॉपिंग सेंटरवर ( Gazebo Shopping Center ) अज्ञात इसमानी फायरिंग ( Firing at Gazebo Shopping Center ) केल्याची घटना गुरुवारी रात्री घडल्याने या परिसरात एकच खळबळ माजली. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन अज्ञात इसम मोटरसायकलने आले आणि त्यांनी शॉपिंग सेंटरचा समोरच्या रस्त्यावर त्यांची बाईक पार्क केली आणि त्यानंतर रोड क्रॉस करून ते चालत आले आणि गजेबो शॉपिंग सेंटर समोर फायरिंग केली.

Gazibo Shopping Center
गजेबो शॉपिंग सेंटर

By

Published : Aug 12, 2022, 7:36 AM IST

मुंबई,मुंबईतील खारच्या गजेबो शॉपिंग सेंटरवर ( Gazebo Shopping Center ) अज्ञात इसमांनी गोळीबार ( Firing on Gazebo Shopping Center ) केल्याची घटना गुरुवारी 11 ऑगस्टला रात्री 9 च्या सुमारास घडली. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्याने याप्रकरणी खार पोलीस अधिक चौकशी करीत आहे. खार येथील गजेबो शॉपिंग सेंटरमध्ये गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला.





पोलिसांची तातडीने कारवाई : गुरुवारी रात्री घटना घडताच परिस्थिती हाताळण्यासाठी घटनास्थळी पोलिस उपायुक्त मंजुनाथ शिंगे खार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह स्वतः आढावा घेण्यासाठी पोहोचले. तसेच, घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात झाले होते. तसेच, शॉपिंग सेंटर परिसर पोलिसांनी बॅरिकेटींग केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 2 अज्ञात इसम गझेबो शॉपिंग सेंटरकडे मोटर सायकलवर आले होते. शॉपिंग सेंटरसमोर मोटर सायकल पार्क करून ते चालत आत शॉपिंग सेंटरमध्ये आले. शॉपिंग सेंटरसमोर आल्यानंतर हवेत आणि शॉपिंग सेंटरच्या बोर्डवर अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केली. गोळीबार करणाऱ्या इसमांनी घटनास्थळी एक पत्रदेखील टाकल्याची माहिती मिळाली आहे.



इथे धंदा करायचा नाही,गोळीबार करणाऱ्या अज्ञात इसमांनी गोळीबार केल्यानंतर तिथे एक पत्र टाकले. त्या पत्रात धमकीवजा उल्लेख असल्याची माहिती मिळाली आहे. शॉपिंग सेंटरमधील व्यवसाय धंद्यासंदर्भात वाद असल्याचा खार पोलिसांना संशय आहे. खार पोलीस त्या अज्ञात दोन इसामांचा माग काढत असून, या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत.


परिसर नेहमी गजबजलेला बांद्राच्या लिंकिंग रोड हा नेहमीच गजबजलेला असतो. संध्याकाळच्या वेळी ही घटना झालेली तेव्हा या परिसरात मोठ्या संख्येत लोक उपस्थित होते.आरोपींनी फायरिंग केली आणि ते घटानस्थाळवरु फरार झाले.सुदैवाने या प्रकरणात कुणीही जखमी झाले नाही. मात्र तात्काळ घटनास्थळी स्थानिक डीसीपी मंजुनाथ सिंगे, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येत पोलीस दल दाखल झाले. संपूर्ण परिसर बैरिकेट लावण्यात आले. पोलिसांनी या संदर्भात परिसरातल्या सीसीटीव्ही आणि व्यापाऱ्याच्या माहिती प्रमाणे चौकशी सुरू केलेली आहे.

आरोपी अजून फरार या घटनेच्या मागे आरोपी कोण आहेत याचा अद्याप काही सुगावा लागलेला नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. शॉपिंग सेंटरचे काही दुकानदार यांच्या असं म्हणणं आहे की शॉपिंग सेंटरच्या आंत मध्ये जे दुकानदार आहेत त्यांचा ह्या घटनेची संबंध नाही असं काही दुकानदार आपली ओळख ना सांगता म्हणत आहेत. मात्र, हा वाद फुटपाथ वर धंधा लावण्या संदर्भात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. या घटनेचा मागे आरोपी कोण होते ज्यांनी फायरिंग केली किंवा घटनेचा मूळ कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी अद्याप कुठलीही अटक झालेली नाही.

हेही वाचा APMC Market Mumbai नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मिरची, वांगी, तोंडली, गवारचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर

ABOUT THE AUTHOR

...view details