मुंबई - हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन स्थानका बाहेर असलेल्या 'स्कायवॉकला' आग लागल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई: कॉटनग्रीन स्थानका बाहेरील 'स्कायवॉकला' आग - स्कायवॉक
शहरातील हार्बर मार्गावरील स्कायवाॅकला आग लागली असून अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
'स्कायवॉकला' आग
शहरातील हार्बर मार्गावर असलेल्या 'काॅटनग्रीन' स्थानकाबाहेर आज सकाळी आग लागली आहे. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेनंतर रहदारीसाठी हा स्कायवॉक बंद करण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा -सांगलीत शाळेचे गेट अंगावर कोसळून ५ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू