मुंबई -भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रियल इस्टेट मधील आनंदराज इंडस्ट्रियल इस्टेट या कपड्याचा कारखान्यास आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत.
भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग - bhandup
भांडुपच्या सोनापूर इंडस्ट्रियल इस्टेट मधील आनंदराज इंडस्ट्रियल इस्टेट कारखान्यास आज दुपारीच्या सुमारास आग लागली.

आग लागलेला कारखाना
घटनेबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शी
दुसऱ्या मजल्यावरील इतर कारखान्यातील लोकांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे सगळे कर्मचारी बाहेर पळत आले. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. आज कारखाना बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या ४ गाड्या आणि पाण्याच्या टँकरनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी अक्षय चव्हाण यांनी सांगितले.