महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोअर परेलच्या रघुवंशी मिल परिसरातील आग आटोक्यात; परिस्थिती नियंत्रणात असल्याचा महापौरांचा निर्वाळा - kishori pednekar at lower parel

लोअर परेल येथील सुप्रसिद्ध रघुवंशी मिल परिसरात आग लागली आहे. मिलच्या जागी उभारण्यात आलेल्या बी-२ व्यावसायिक इमारतीत आग लागल्याचे समोर आले आहे. अखेर काही वेळापूर्वी ही आग आटोक्यात आली आहे.

fire in mumbai
लोअर परेल येथील सुप्रसिद्ध रघुवंशी मिलला आग लागली आहे.

By

Published : Jun 25, 2020, 1:27 PM IST

Updated : Jun 25, 2020, 5:48 PM IST

मुंबई -लोअर परेल येथील सुप्रसिद्ध रघुवंशी मिल परिसरात आग लागली आहे. मिलच्या जागी उभारण्यात आलेल्या बी-२ व्यावसायिक इमारतीत आग लागल्याचे समोर आले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी रघुवंशी मिलला भेट दिली आहे.

तळ मजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीचे लोट बाहेर येत असल्याचे वृत्त असून या ठिकाणची कार्यालये बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी रघुवंशी मिलला भेट दिली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी रघुवंशी मिलला भेट दिली आहे. तसेच अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती महापौरांनी दिली.

Last Updated : Jun 25, 2020, 5:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details