महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पवईत हॉटेलला भीषण आग; मालमत्ता जळून खाक - fire in mumbai

आयआयटी मार्केट जंक्शन समोर असणाऱ्या एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी सातच्या दरम्यान घडली. अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यात यश आले आहे. मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय.

fire in mumbai
पवईत हॉटेलला भीषण आग; मालमत्ता जळून खाक

By

Published : Oct 12, 2020, 10:49 AM IST

मुंबई - पवई आयआयटी मार्केट जंक्शन समोर असणाऱ्या एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे. यामध्ये हॉटेल पूर्णपणे जळून भस्मसात झाले आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

पवईत हॉटेलला भीषण आग; मालमत्ता जळून खाक

पंजाब तडका हॉटेल हे आयआयटी मार्केट जंक्शन जवळच आहे. दरम्यान, सकाळी हे हॉटेल बंद होते. आतून आगीचे लोळ बाहेर पडत असताना रहिवाश्यांमध्ये गोंधळ उडाला होता. काही वेळातच या आगीने रौद्ररुप धारण केले. यामुळे संपूर्ण जागेला आगीने वेढले आणि या दुर्घटनेत दुकान जळून खाक झाले आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरीही मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details