मुंबई -चांदिवलीतील चित्रीकरण स्टुडिओला आग लागली असून अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.
चांदिवलीच्या बालाजी स्टुडिओला आग लागल्याची घटना आज दुपारी ३.३० वाजता घडली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सेट जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 'कुंमकुम भाग्य'या मालिकेचे शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अचानक आग लागल्याने कलाकार आणि कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.