मुंबई -शहरातील नेपियन सी रोड रोड परिसरातील एका इमारतीच्या 6 व्या मजल्याला आज पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांना अग्नीशमन दलाने सुखरुपपणे बाहेर काढले आहे. अग्नीशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
मुंबईतील नेपियन सी रोड परिसरातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग - नेपीयन सी रोड इमारतीला आग
इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्यानंतर तिथे अडकलेल्या दोन महिलांना अग्नीशमन दलाच्या जवानांनी सुखरुपपणे बाहेर काढले आहे.
हेही वाचा..."त्यांच्या" हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या!
मुंबईतील नेपिअनसी रोड येथील एटलास या इमारतीला पहाटे 4.40 च्या सुमारास आग लागली होती. या 10 मजली इमारतीतील सहाव्या मजल्यावर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे एका फ्लॅटमधील बेडरुममध्ये आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. अग्निशमन दलाने बचावकार्यादरम्यान दोन महिलांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्नीशमन दलाच्या तीन गाड्यांनी ही आग अटोक्यात आणली आहे.