मुंबई - गजबजलेल्या अशा भेंडी बाजार परिसरातील दुकानाला आग लागली आहे. दुकानाला लागलेल्या आगीवर मुंबई अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवल्याची व या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
भेंडी बाजारातील दुकानाला लागलेली आग नियंत्रणात - mumbai fire brigade latest news
मुंबई अग्निशमन दलाची 4 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाली. ही आग लेव्हल 2 ची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. सकाळी 11.40 वाजता लागलेल्या आगीवर दुपारी 12.56 वाजता नियंत्रण मिळवण्यात आले असून आगीत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील गर्दीचा भाग म्हणून भेंडी बाजार ओळखला जातो. भेंडी बाजारमधील मोहम्मद अली रोड वर जुम्मा मस्जिद आहे. या मस्जिदजवळील सुतार चाळीत दुकानाला लागली आग लागली आहे. हा परिसर नेहमी गजबजलेला असल्याने आगीवर नियंत्रण करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाची 4 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाली. ही आग लेव्हल 2 ची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. सकाळी 11.40 वाजता लागलेल्या आगीवर दुपारी 12.56 वाजता नियंत्रण मिळवण्यात आले असून आगीत अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.