मुंबई - बांद्रा पश्चिम परिसरातील बँड स्टँड येथील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. जिवेश असे या इमारतीचे नाव आहे. जिवेश इमारतीच्या 14 व्या मजल्यावर ही आग लागली असून, घटनस्थळी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. लेव्हल 2 ची ही आग असल्याची माहिती मिळाली ( fire breaks out bandra at jivesh building ) आहे.
Bandra Fire : बांद्र्यातील 'जिवेश' इमारतीच्या 14 व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल - Bandra Fire latest news
बांद्रा पश्चिम परिसरातील बँड स्टँड येथील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. जिवेश असे या इमारतीचे नाव आहे. जिवेश इमारतीच्या 14 व्या मजल्यावर ही आग लागली ( fire breaks out bandra at jivesh building ) आहे.
Bandra Fire
जिवेश इमारतीच्या 14 व्या मजल्यावर आज ( 9 मे ) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास आग लागली. ही इमारत तळ अधिक 21 मजली आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु होते. तेव्हाच 8.20 च्या सुमारास आगीचे प्रमाण वाढले. त्यानंतर ही आग लेव्हल 2 ची असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच, आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
Last Updated : May 9, 2022, 10:53 PM IST