मुंबई - पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री या आगीची माहीती घेत आहेत. पुण्यातील मांजरी परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. कोव्हिशील्ड या लशीची निर्मिती या इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी एक वाजता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळण्यासाठी प्राधान्य - उपमुख्यमंत्री
दरम्यान ही आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहे. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना-