मुंबई - मालाडमधील चिकुवाडीतील एका झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली आहे. मालाड येथील मोहिते पाटील नगरधील आरबीटी कॉलनी, अग्रवाल टॉवर जवळ ही झोपडपट्टी आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
मालाडमधील चिकुवाडीतील झोपडपट्टीला आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश - चिकुवाडी झोपडपट्टीला आग
मालाडमधील चिकुवाडीतील एका झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग विझवण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
मालाडमधील चिकुवाडीतील झोपडपट्टीला आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
आग ही लेव्हल वन स्टेजची होती. झोपडपट्टीवर टाटा पॉवर वीज कंपनीच्या वायरी असल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. घटनास्थळी 3 फायर इंजिन, 3 जम्बो टँकर दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आले आहे.
Last Updated : Nov 23, 2020, 5:14 PM IST