मुंबई - बॅलार्ड पियर परिसरातील एक्सचेंज बिल्डिंगला आज दुपारी आग लागली. या इमारतीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) कार्यालय आहे. रिया चक्रवर्ती प्रकरणाची चौकशी याच कार्यालयात होत आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
मुंबईतील एनसीबी कार्यालय असलेल्या इमारतीला आग - एनसीबी ऑफीस
इमारतीच्या तिसर्या मजल्यावर एनसीबीचे कार्यालय आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही वृत्त नाही.
मुंबईतील एनसीबी कार्यालयाला लागली आग
इमारतीच्या तिसर्या मजल्यावर एनसीबीचे कार्यालय आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही वृत्त नाही. मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या कार्यालयातच बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा ड्रग्ज अँगल तपासला जात आहे. येथेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सर्व ड्रग पेडलर्सची चौकशी केली. अटकेनंतर रियाने एक रात्र याच इमारतीतील एनसीबी ऑफिसच्या लॉकअपमध्ये घालवली होती.
Last Updated : Sep 21, 2020, 8:05 PM IST