महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kamala Building Fire : कमला इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर - मुंबईतील आग

नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आज सकाळी आग लागली आहे (Kamala Building Fire). ही इमारत 20 मजली असून 18 व्या मजल्यावर आग लागली आहे. यात सहा जणांचा मृत्यू (Six Death) झाला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग नियंत्रणात आली आहे.

कमला इमारतीला आग
कमला इमारतीला आग

By

Published : Jan 22, 2022, 8:52 AM IST

Updated : Jan 22, 2022, 9:52 PM IST

मुंबई - नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला (Fire incident at Kamala building) आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत 29 जण जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू (Six Deaths) झाला आहे. इतरांची प्रकृती स्थिर असून भाटिया, नायर, कस्तुरबा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत (Govt give Ex gratia Amount of Rs 5 lakhs) जाहीर केली आहे.

  • कमला इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका उपायुक्त यांची चौकशी समिती स्थापन -

कमला इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका उपायुक्त यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागील दोन महिन्यात मुंबईतील २२३ बहुमजली इमारतींना अग्निसुरक्षा उपाययोजना निष्काळजी प्रकरणी नोटीसही देण्यात आल्या आहेत.

घटनास्थळाची मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी
  • घटनास्थळाची मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी

आग लागलेल्या घटनास्थळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली आहे. तसेच जखमी झालेल्या रुग्णांची व नातेवाईकांची आदित्य ठाकरे यांनी विचारपूस केली. आदित्य ठाकरे यांच्यासोबत यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, शिवसेनेचे नेते पांडुरंग सपकाळ तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते व नगरसेवक उपस्थित होते.

  • पंतप्रधानांकडून मदत जाहीर -

PM नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील तारदेव येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

  • राष्ट्रपतींनी केले ट्विट -

मुंबईतील एका इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेबद्दल कळल्यावर दुःख झाले. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी प्रार्थना आहे, असे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.

  • कमला इमारतीत भीषण आग -
    आगीत सात जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार नाना चौक गवालीया टॅंक येथे 20 मजली कमला इमारत आहे. या इमारतीच्या 18 व्या मजल्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आगीने तीव्र रूप धारण केल्याने पावणे आठच्या सुमारास आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा करण्यात आली आहे. 13 फायर इंजिन आणि 7 जंबो टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. ही आग शॉकसर्किटमुळे लागल्याचे समजते.

आगीविषयी नागरिक माहिती देताना
  • 6 जणांचा मृत्यू -

आगीत जखमी झालेल्या 29 जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. नायर रुग्णालयात 7 जणांना दाखल केले त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबामध्ये 2 जणांना दाखल केले त्यापैकी 1 मृत्यू झाला.

कमला इमारतीला आग

भाटिया रुग्णालयामध्ये 17 जणांना दाखल केले त्यापैकी 12 जण रुग्णालयात दाखल असून त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर आहे तर 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मसिना रुग्णालयात एकाला दाखल केले त्याची प्रकृती स्थिर आहे. वोखार्ड रुग्णालयात एकाला दाखल केले मात्र त्याने स्वताहून डिस्चार्ज घेतला आहे. रिलायंस रुग्णालयात एकाला दाखल केले त्यानेही स्वताहून डिस्चार्ज घेतला आहे.

कमला इमारतीला आग
  • 29 जखमी -

या आगीत 29 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. इतरांची प्रकृती स्थिर असून भाटिया, नायर, कस्तुरबा, मसिना रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान एका मृताची नोंद भाटिया आणि नायर रुग्णालयात दोन्ही ठिकाणी नोंद झाल्याने 7 मृत्यू जाहीर करण्यात आले होते. मात्र हा प्रकार निदर्शनास आल्यावर 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Jan 22, 2022, 9:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details