महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जामा मस्जिद परिसर आग : तब्बल १८ तासांनंतरही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरूच - मुंबई मस्जिद बंदर आग

मस्जिद बंदरजवळील कटलेरी मार्केटला रविवारी संध्याकाळी आग लागली होती. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमन दलाने या आगीवर सर्व बाजूने नियंत्रण मिळवल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली होती. मात्र, त्यानंतर आज सकाळी ही आग पुन्हा भडकली. आग लागून 18 तास होऊन गेले, तरीही ती पूर्णपणे विझली नाहीये.

Fire at Ismail Building near Jumma Masjid in Masjid Bunder
जामा मस्जिद परिसरात भीषण आग

By

Published : Oct 5, 2020, 7:10 AM IST

Updated : Oct 5, 2020, 1:23 PM IST

मुंबई :होलसेल मार्केट म्हणून ओळख असलेल्या मस्जिद बंदर येथील कटलेरी मार्केटला काल सायंकाळी आग लागली होती. रात्री या आगीने भीषण रूप धारण केले. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमन दलाने या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली होती. मात्र, त्यानंतर आज सकाळी ही आग पुन्हा भडकली. आग लागून 18 तास होऊन गेले, तरीही ती पूर्णपणे विझली नाहीये.

मुंबईत मस्जिद बंदर येथे जुम्मा मस्जिद जवळ कटलरी मार्केट आहे. या मार्केटमधील इस्माईल बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर काल (रविवारी) सायंकाळी 4.24च्या सुमारास आग लागली होती. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून या आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाचे 5 फायर इंजिन आणि 4 जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.

सायंकाळी 4.56 वाजता या आगीची 'लेव्हल 2' होती, म्हणजेच जास्त मोठी आग नव्हती. मात्र आग विझवण्याचे काम सुरू असताना ही आग इतर ठिकाणी पसरत गेल्याने आगीने रात्री भीषण रूप घेतले. रात्रीपर्यंत या आगीला लेव्हल थ्रीची आग घोषित करण्यात आले. त्यानंतर, रात्री 11.12 वाजता अग्निशमन दलाने आगीवर सर्व बाजूने नियंत्रण मिळवल्याची व आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली होती.

मात्र, त्यानंतर आज सकाळी आग पुन्हा भडकली, 'लेव्हल फोर'ला पोहोचली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ही आग नियंत्रणामध्ये असून, घटनास्थळी 9 फायर टेंडर आणि 7 जंबो टँकर हजर आहेत. या घटनेत मुंबई अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी डी. डी. पाटील (४०) यांना किरकोळ दुखापत झाली असल्याने जे.जे. रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाने याबाबत माहिती दिली.

Last Updated : Oct 5, 2020, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details