नवी मुंबई -नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका हॉटेलला रात्रीच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. गॅसचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे.
Navi Mumbai Fire : कामोठे परिसरातील हॉटेलला भीषण आग; कोणतीही जीवित हानी नाही - कामोठे नवी मुंबई आग
कामोठे येथील सेक्टर 12 परिसरात असणाऱ्या स्वस्तिक प्लाझा या इमारतीत तळमजल्यावर असणाऱ्या हॉटेलला भीषण आग लागली. गॅसचा स्फोट झाल्याने ही आग लागली व शॉक सर्किट झाल्यानंतर ही आग पसरली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
![Navi Mumbai Fire : कामोठे परिसरातील हॉटेलला भीषण आग; कोणतीही जीवित हानी नाही आग विझवतांना अग्निशमन दल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14346394-thumbnail-3x2-fire.jpg)
आग विझवतांना अग्निशमन दल
हॉटेलला लागलेली आग
कामोठे येथील सेक्टर 12 परिसरात असणाऱ्या स्वस्तिक प्लाझा या इमारतीत तळमजल्यावर असणाऱ्या हॉटेलला भीषण आग लागली. गॅसचा स्फोट झाल्याने ही आग लागली व शॉक सर्किट झाल्यानंतर ही आग पसरली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
हेही वाचा -Car Accident Karimnagar : भरधाव कार झोपडीवर आदळल्याने चार महिलांचा मृत्यू
Last Updated : Feb 2, 2022, 3:06 AM IST