महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सायन कोळीवाड्यातील हॉटेलला आग; २ जखमी

मुंबईतील सायन कोळीवाडा येथील एका चायनीज हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

हॉटेलला लागलेली आग

By

Published : Aug 28, 2019, 10:00 AM IST

मुंबई -सायन कोळीवाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. यात हॉटेलचा तळमजला पूर्ण जळून खाक झाला आहे. तसेच हॉटेलात काम करणारे २ कामगारही जखमी झाले आहेत. जखमींना कामगारांना सायन रुग्णालयात नेण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. या आगीत हॉटेलमधील साहित्याची हानी झाली आहे.

आग विझवताना नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान

घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाची २ वाहने आणि १ पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहोचला. हॉटेलला मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. मात्र, रात्र असल्याने या ठिकाणी जास्त लोकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

दरम्यान, मध्यरात्री भायखळा येथे देखील आग लागली होती. त्यामुळे मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे, असे चित्र मुंबईकरांना पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details