मुंबई : भांडुप येथील ड्रीम्स मॉलला गुरूवार रात्री १२ च्या सुमारास आग लागली. ही आग गेल्या १५ तासांहून अधिक काळ विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत एकूण ७६ रुग्णांना अग्निशमन दलाने बाहेर काढले आहे. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.
मुंबईतील मोठ्या आग दुर्घटना! - मुंबई इमारत आग दुर्घटना
भांडुपमध्ये आज लागलेल्या आगीमुळे मुंबईतील यापूर्वी झालेल्या मोठ्या आग दुर्घटनांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे...
मुंबईतील मोठ्या आग दुर्घटना!
मुंबईमध्ये आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. आजच्या या दुर्दैवी घटनेमुळे या काही मोठ्या दुर्घटनांच्या आठवणींना उजाळा मिळाला...
- 23.10.2020 : मुंबईच्या नागपाडा भागात असणाऱ्या सिटी सेंटर मॉलला भीषण आग लागली होती. १४ फायर इंजिन आणि १७ जंबो टँकर्सच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
- 26.08.2020 : मुंबईच्या वरळी भागामध्ये एका १५ मजली इमारतीला मोठी आग लागली होती.
- 17.02.2020 :भायखळ्यातील माझगावमध्ये असणाऱ्या जीएसटी भवनाच्या आठव्या माळ्याला आग लागली होती. या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील कार्यालये नूतनीकरण केले जात होती. त्याजागी जुने लाकडी सामान तसेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे शॉर्ट सर्किटने आग लागल्यावर जुन्या लाकडी सामानाने पेट घेऊन आग भडकल्याचे समोर आले होते.
- 22.12.2019 :पश्चिम मुंबईच्या विलेपार्ले भागात असणाऱ्या श्रीवल्ली इमारतीच्या सातव्या, आठव्या आणि तेराव्या माळ्याला आग लागली होती. आगीची भीषणता पाहता 8 फायर इंजिन आणि 6 जंबो टँकर घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत होते.
- 28.12.2018 :टिळकनगर भागातील एका १६ मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार वृद्धांचा समावेश होता. तसेच, यात दोन जण गंभीर जखमी झाले होते.
- 22.08.2018 :परेलमधील हिंदमाता सिनेमाजवळ असलेल्या क्रिस्टर टॉवर या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. यासोबतच या दुर्घटनेत सुमारे १४ लोक जखमी झाले होते.
- 30.05.2018 :गोरेगावमध्ये असलेल्या टेक्निक प्लस वन इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. या इमारतीत काम करणाऱ्या १००हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले होते.
- 01.04.2018 :मरोल भागातील मैमून इमारतीला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता. यासोबतच या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते.
- 28.12.2017 : कमला मिल्स कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका चार मजली इमारतीवर असणाऱ्या रेस्टॉरंटला आग लागली होती. या भीषण आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला होता, तर १६ जण जखमी झाले होते. यात बळी गेलेल्यांमध्ये ११ महिलांचा समावेश होता ज्या आपल्या मैत्रिणिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी याठिकाणी आल्या होत्या. खुशबू मेहता बन्साली यांचा वाढदिवस होता, त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
- 18.12.2017 : साकीनाका परिसरात असणाऱ्या एका स्नॅक शॉपला लागलेल्या भीषण आगीत १२ लोकांचा मृत्यू झाला होता. याठिकाणी काम करणारे लोक कम्पाऊंडमध्ये अडकल्यामुळे त्यांचा बचाव करणे अशक्य झाले.
- 06.07.2015 : पवईमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये सात लोकांचा मृत्यू झाला होता, तर २२ जण गंभीर जखमी झाले होते.