मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती ललित टेकचंदानी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (FIR on Chhagan Bhujbal) यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Chhagan Bhujbal FIR Chembur Police Station) आहे. टेकचंदानी यांनी चेंबुर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) आणि 34 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FIR on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांवर मुंबईत गुन्हा दाखल; धमकी दिल्याची होती तक्रार - धमकी प्रकरण छगन भुजबळ गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (FIR on Chhagan Bhujbal) आणि इतर 2 जणांवर आयपीसी कलम 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरच्या एका रहिवाशाने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार (Chembur Police Station) दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
काय दिली होती धमकी -‘तू भुजबळ साहेबांना मेसेज पाठवतो, तुझ्या घरी येऊन गोळ्या टाकतो. बाहेरचे लोक लावतो, बाहेरचे दुबईचे. कळलं ना. भुजबळ साहेबांना मेसेज करणं महागात पडेल, कोण आहे तु, कुठे राहतो, माज करतो का? काय प्रॉब्लेम आहे? अशा शब्दात धमक्या देण्यात आल्या असल्याच टेकचंदानी यांनी जबाबात म्हटले आहे. हे मेसेज आणि फोन कॉल्स कोणी केले यांचा पोलीस छड़ा लावत आहेत.
चेंबूर पोलिसांकडून तपास सुरू - ललित टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलवर 2 व्हिडिओ पाठवले होते. ज्यात भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. मात्र, व्हिडिओ पाठवल्यानंतर तात्काळ टेकचंदानी यांना धमक्या देणारे फोन आणि मेसेज येऊ लागले. ज्यात त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. दरम्यान, टेकचंदानी यांनी भुजबळ यांना ज्या नंबरवर संबंधित व्हिडीओ पाठवले तो नंबर आणि ज्या नंबरवरुन धमक्या आणि मेसेजेस आले तो नंबर पोलिसांना तपासासाठी दिले आहेत.