महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माजी मंत्री आरीफ नसीम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल, महिलेने केली होती तक्रार - Arif Naseem Khan

महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री मोहम्मद आरीफ नसीम खान यांच्या अडचणी वाढणार आहेत. मुंबई पोलिसांनी रविवारी माजी मंत्री आरीफ नसीम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरुन आरीफ नसीम खान यांच्यासह चार जणांवर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR lodged against former minister Arif Naseem Khan
माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल

By

Published : Nov 1, 2021, 11:50 AM IST

मुंबई- महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री मोहम्मद आरीफ नसीम खान यांच्या अडचणी वाढणार आहेत. मुंबई पोलिसांनी रविवारी माजी मंत्री आरीफ नसीम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरुन आरीफ नसीम खान यांच्यासह चार जणांवर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका महिलेच्या वक्तव्याच्या आधारे, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ नसीम खान आणि इतर चार जणांविरोधात भारतीय दंड विधानच्या कलम ३५४, ५०९, ५०६, ३२३, ५०४ आणि ३४ अन्वये अंधेरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी पोलीस स्टेशन अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत आतापर्यंत फारशी माहिती समोर आलेली नाही. त्याचवेळी आरीफ नसीम खान यांच्याकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही वक्तव्य आलेले नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे आघाडी सरकार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details