मुंबई-अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. रणवीर सिंग यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपहार्य पोस्टमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 292 ,293 , 509 आणि आयटी ॲक्ट 67 ( ए )अंतर्गत चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल एका सामाजिक कार्यकर्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. ( Actor Ranveer Singh Nude Photo ) ( FIR against actor Ranveer Singh in Mumbai )
अभिनेता रणवीर सिंगने काही दिवासांपूर्वी न्यूड फोटो टाकल्याने खळबळ उडाली ( ranveer singh nude photoshoot ) होती. त्यावरुन त्याच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली होती. तर, काही जणांनी त्याचे समर्थन केलं होते. त्यातच आता रणवीर सिंगविरोधात आता लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉ. ललित चांद यांच्यामार्फत वकील अखिलेश चौबे यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात यांनी ही तक्रार नोंदवली ( mumbai police complaint filed against Ranveer Singh ) आहे.
भाजप नेते व वकील अखिलेश चौबे यांची पोलिसांत तक्रार-अभिनेता रणवीर सिंग च्या अडचणीत वाढ झाली आहे न्यूड फोटो इंटरनेटवर शेअर केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता सोमवार रोजी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. आता चेंबूर पोलिसांकडून रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रणवीर सिंगच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि वकील अखिलेश चौबे यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोवर काही लोकांकडून टिकेची झोड उडाली आहे. तर काही लोक रणवीरचे समर्थ करण्यास मैदानात उतरल्याचे चित्र देखील आहे. रणवीर सिंहच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंद करण्यात आला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंहविरोधात आयपीसी कलम 292, 293, 509, ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं. यामुळे न्यूड फोटोशूट करणे रणवीरच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसते आहे.
हेही वाचा -Ranveer Singh : रणवीर सिंगला न्यूड फोटोशूटचं प्रकरण भोवणार?, पोलिसांत तक्रार दाखल
रणवीर सिंहला कायदेशीर नोटीस-न्यूड फोटो इंटरनेटवर शेअर केल्या प्रकरणी ऍडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर यांनी रणवीर सिंह यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या सर्व पोस्ट तीन दिवसात डिलीट करण्यात यावे असे रणवीर सिंहला पाठवलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे. याच पोस्ट प्रकरणात आज चेंबूर पोलीस स्टेशनमध्येदेखील रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे रणवीर सिंह यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. रणवीर सिंह हा मोठा कलाकार असून त्याचे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. अशाप्रकारे पोस्ट केल्याने तरुण पिढी वाईट दिशेने जाऊ शकते. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या रणवीर सिंहने या सर्व पोस्ट डिलीट केल्या पाहिजे असे नोटीसमध्ये म्हटले आहे. जर रणवीर सिंहने हे पोस्ट डिलीट केली नाही तर त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.