नवी दिल्ली :केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा केल्या. यात नागपूर आणि नाशिक मेट्रोचा समावेश आहे. याशिवाय मुंबई-कन्याकुमारी महामार्ग आणि भूसावळ-खरगपूर रेल कॉरिडोरसाठी तरतूदींची घोषणाही त्यांनी केली.
अर्थसंकल्पात नागपूर मेट्रो फेस टूसाठी 5 हजार 976 कोटींची तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे. तर मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे.
नागपूर मेट्रो फेस 1
फेब्रुवारी 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने नागपूर मेट्रोला मंजुरी दिली होती. ऑगस्ट 2014 मध्ये केंद्राने याला मंजुरी दिली. 31 मे 2015 मध्ये या प्रकल्पाच्या उभारणीला सुरूवात झाली. सप्टेंबर 2017 मध्ये मेट्रोच्या ट्रायल रनला सुरूवात झाली. तर मार्च 2019 मध्ये नागपूर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले.
नाशिक मेट्रोचा प्रस्ताव
ग्रेटर नाशिक मेट्रोने नाशिकसाठी मेट्रोचा प्रस्ताव ठेवला आहे. या माध्यमातून नाशिकमध्ये 32 किमी लांबीच्या मार्गावर मेट्रो चालविली जाणार आहे. श्रमिक नगर ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि गंगापूर ते मुंबई नाका या मार्गावर नाशिक मेट्रो धावेल.