Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दाखल; 3 पथकाद्वारे शोध सुरू - किरीट सोमय्या अपडेट्स
आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक किरीट सौमय्या यांच्या घरी पोहोचले आहे. पोलिसांकडून सोमय्यांचा कसून शोध घेतला जात आहे. अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या EOW पथकाने किरीट सोमय्या यांच शोध घेण्यासाठी 3 पथके तयार केली आहेत.
किरीट सोमय्या
मुंबई- भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांकडून 3 पथकाद्वारे शोध सुरू आहेत. त्यापैकी आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक किरीट सौमय्या यांच्या घरी पोहोचले आहे. पोलिसांकडून सोमय्यांचा कसून शोध घेतला जात आहे. अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या EOW पथकाने किरीट सोमय्या यांच शोध घेण्यासाठी 3 पथके तयार केली आहेत. किरीट सोमय्या यांचे कार्यालय, निकटवर्तीय आणि इतर ठिकाणी भेटी देत आहेत